Maharashtra Teachers Strike : महाराष्ट्रात आज शिक्षकांचं राज्यव्यापी आंदोलन, ‘या’ मागण्यांसाठी पुकारला संप, मुंबईत शाळा सुरू की…

| Updated on: Dec 05, 2025 | 11:11 AM

महाराष्ट्रामध्ये शिक्षकांनी आज राज्यव्यापी संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले असले तरी मुंबईतील शाळा नियमितपणे सुरू आहेत. संपात सहभागी झाल्यास शिक्षण विभागाने वेतन कपातीचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रामध्ये आज शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. तरीही, मुंबई आणि आसपासच्या शहरातील शाळा सकाळपासून नियमितपणे सुरू असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाने संपात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना एका दिवसाचे वेतन कापण्याचा इशारा दिला आहे. या ताकीदीमुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक शाळांनी आपले कामकाज सुरू ठेवले आहे. शिक्षक संघटना 2024 ची संच मान्यता धोरण रद्द करण्याची आणि टीईटी परीक्षेमुळे वाढलेल्या संभ्रमावर तोडगा काढण्याची मागणी करत आहेत. जर शिक्षकांच्या या मागण्यांवर तोडगा काढला नाही, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावतीमधील 12 हजार संघटनांचे शिक्षक देखील या संपात सहभागी होणार असल्याचे निवेदन जारी करण्यात आले आहे.

Published on: Dec 05, 2025 11:10 AM