Mumbai | मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच, सायन रुग्णालय इमारतीच्या कार्यक्रमावरुन वाद!
मुंबई महानगरपालिकेत महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. सायन रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या कार्यक्रमावरून सत्ताधारी गटात वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात महापौरांना वगळता इतर समिती अध्यक्ष आणि नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई महानगरपालिकेत महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. सायन रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या कार्यक्रमावरून सत्ताधारी गटात वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात महापौरांना वगळता इतर समिती अध्यक्ष आणि नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होऊ न दिल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींनी नाराजी दर्शवली आहे. यामुळे महायुतीत मानापमानाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी आज महापौरांच्या दालनात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत संबंधित नेते आणि पदाधिकारी सहभागी होणार असून मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातात आणि हा वाद कसा मिटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
