BMC Mayor | मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट

BMC Mayor | मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट

| Updated on: Jan 24, 2026 | 5:52 PM

. गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवडीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या विलंबामुळे मुंबईतील सत्तासमीकरणांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांकडून यावर टीका केली जात आहे. मात्र नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची महापालिकेतील गट नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेला विलंब होत आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौरपदासाठी 31 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने कोकण आयुक्तालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह गट नोंदणी न केल्याने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आहे. गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवडीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या विलंबामुळे मुंबईतील सत्तासमीकरणांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांकडून यावर टीका केली जात आहे. मात्र नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Published on: Jan 24, 2026 05:52 PM