Manikrao Kokate: कोकाटेंच्या ‘रमी’ व्हिडीओची विधिमंडळाकडून चौकशी होणार? मोठी अपडेट आली समोर

Manikrao Kokate: कोकाटेंच्या ‘रमी’ व्हिडीओची विधिमंडळाकडून चौकशी होणार? मोठी अपडेट आली समोर

| Updated on: Jul 24, 2025 | 10:07 AM

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मोबाइलवर रमी खेळत असल्याच्या वादग्रस्त चित्रीकरणाची चौकशी विधीमंडळाकडून केली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोबाइलवर रमी खेळत असल्याचे वादग्रस्त चित्रीकरण समोर आले होते. या चित्रीकरण कोणी केले, याचा शोध घेण्यासाठी विधिमंडळ सचिवालयाने चौकशी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी ही चित्रफीत आपल्या सोशल मिडियावर टाकून उघड केली होती. ज्यामुळे कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे चित्रीकरण कोणी केले, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सत्ताधारी बाकांवरील कोणीतरी हे चित्रीकरण केले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधिमंडळ सचिवालयाने या चित्रीकरणाच्या मागे कोण आहे, याची तपासणी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या भाषणादरम्यानच्या सभागृहातील संपूर्ण कामकाजाच्या चित्रीकरणाची पडताळणी केली. मात्र, सभागृहात कोणीही मोबाइलद्वारे चित्रीकरण करताना आढळले नाही, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता प्रेक्षक गॅलरीतून कोणी चित्रीकरण केले असावे का, याची चौकशी केली जाणार आहे. या तपासानंतर सभापती राम शिंदे यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Published on: Jul 24, 2025 10:05 AM