Maratha Reservation Rally :  मोर्चा सुरू असतानाच मराठा आंदोलकाचा मृत्यू; मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Maratha Reservation Rally : मोर्चा सुरू असतानाच मराठा आंदोलकाचा मृत्यू; मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Aug 28, 2025 | 2:23 PM

मनोज जरांगे पाटील आज सकाळी शिवनेरी किल्यावरवर दाखल झाले. महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले असताना ही धक्कादायक बातमी समोर आली आहे

मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा सुरू असताना मराठा आंदोलक सतीश देशमुख याचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. हा आंदोलक बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वडगावमधील आहे. या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे.

असं करू नका, संयम धरा, शांत रहा. मी काहीच कमी पडू देत नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकाचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाहीतर जरांगे पुढे असेही म्हणाले, आता आपण उद्या मुंबईत आपल्या लेकरा बाळांसाठी आमरण उपोषणाला बसतोय. मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्याकरता एका दिवसाची परवानगी दिली आहे. ५ हजार आंदोलक बसण्यासाठी त्यांनी परवानगी दिली तर पाच हजार बसवू बाकी दुसरीकडे बसू… ते पाच हजार गेले की दुसरे पाचहजार जाऊ.. डोक्याचा वापर करा आडमुठेपणा करू नका… सतीश देशमुख सारख्याचं बलिदान गेलंय. असं होऊ द्यायचं नाही त्यासाठी संयम महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी म्हटलं.

Published on: Aug 28, 2025 02:22 PM