Manoj Jarange Patil : परवानगी मिळाली पण फक्त एका दिवसाची… जरांगे पाटलांसह भगवं वादळ मुंबईच्या दिशेने..
जालन्यातील अंतरवाली सराटीहून मोठ्या संख्येने मराठ्यांचा हा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. दरम्यान एका दिवसाची परवानगी मिळाली असली तरीसुद्धा मांगणी मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचं जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील आज सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठ्यांचा ताफा घेऊन जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले. ताफा अर्ध्या वाटेवर येण्याआधीच मुंबई पोलिसांकडून आजाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी मिळाली आहे. मात्र एक दिवस नाही तर बेमुदत उपोषणावर जरांगे पाटील ठाम आहे आणि मागणी स्पष्ट आहे, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण हवंय…
मुंबई हायकोर्टाने परवानगी शिवाय मुंबईत उपोषणास मनाई केली होती. त्यानंतर जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबई पोलिसांना भेटलं आणि परवानगी मिळाली पण एकाच दिवसाची.. एका दिवसांची परवानगी जरी मिळाली असली तरी आंदोलकांची संख्या पाच हजार पेक्षा अधिक नसावी, आंदोलनाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत असणार, मुख्य आंदोलकांसोबत फक्त पाच वाहन आझाद मैदानात जातील, आंदोलकांना ईस्टर्न फ्री वे वडो बंदर जंक्शन पर्यंत पोहोचता येणार, इतर वाहनांसाठी शिवडी, ए शेड आणि कोटन ग्रीन परिसरात नियोजन असणार, आंदोलकांना आंदोलन स्थळी जेवण बनवता येणार नाही, अटींचं उल्लंघन केल्यास आंदोलन बेकायदेशीर घोषित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
