Maratha Aarakshan Protest : जरांगेंच्या आंदोलनाला आमदार-खासदारांचा पाठिंबा, ‘या’ सत्ताधाऱ्यांचाही सहभाग

Maratha Aarakshan Protest : जरांगेंच्या आंदोलनाला आमदार-खासदारांचा पाठिंबा, ‘या’ सत्ताधाऱ्यांचाही सहभाग

| Updated on: Aug 28, 2025 | 5:24 PM

प्रकाश सोळंके, विलास भुमरे, विजयसिंह पंडितांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिल्याचं कळतंय. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या तीन खासदारांचा आणि दोन आमदारांचा सुद्धा जरांगेंना पाठींबा असल्याची माहिती आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विविध पक्षांतील आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामध्ये तीन सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिल्याची मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट आणि शिंदे गट) या पक्षांचे आमदार आणि खासदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत तर काहीनी पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे आंदोलनाला मोठी ताकद मिळाली आहे.

जरांगेंना कोणत्या आमदार-खासदारांचा पाठींबा?

राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके हे आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार

राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे जरांगेच्या आंदोलनात सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे जरांगेच्या आंदोलनात सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित जरांगेच्या समर्थनात मतदारसंघात भव्य पोस्टर

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजें निंबाळकर जरांगेच्या आंदोलनाला स्पष्ट पाठींबा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव जरांगेच्या आंदोलनात सहभागी होणार

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे जरांगेच्या आंदोलनात सहभागी व्हा, फेसबुक पोस्टद्वारे आवाहन.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे जरांगेच्या आंदोलनाला पाठींबा

Published on: Aug 28, 2025 05:24 PM