Manjoj Jrange Patil LIVE | मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार विश्वासघात करत आहे, मग आता…

Manjoj Jrange Patil LIVE | मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार विश्वासघात करत आहे, मग आता…

| Updated on: May 16, 2026 | 12:18 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापू लागले आहे. नुकतीच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची ग्वाही दिली. महत्त्वाची बाब म्हणजे आधी झालेल्या आंदोलनानंतरही सरकारने विश्वासघात केल्याच्या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जात आहेत, मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. आठ महिने उलटूनही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलन होणारच असा इशारा दिला गेला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, जरांगे यांनी शासनाबाबत अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. आता मराठा आरक्षणाबाबत पेटलेला हा वाद पुढे प्रचंड मोठं रूप घेईल की काय, अशी शंका वर्तवली जात आहे.

Published on: May 16, 2026 12:17 PM
Follow Us