Mantralay : मंत्रालयातील 7 व्या मजल्यावर सिलिंग कोसळलं, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बाहेर..

Mantralay : मंत्रालयातील 7 व्या मजल्यावर सिलिंग कोसळलं, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या बाहेर..

| Updated on: Jul 25, 2025 | 2:02 PM

मंत्रालयातील सातव्या मजल्यावर सिलिंगचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाहेर सिलिंगचा भाग कोसळल्याची माहिती आहे.

मुंबईतील मंत्रालयात एक दुर्घटना घडली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाहेरच्या सिलिंगला गंज लागल्यामुळे तेथील काही भाग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाहेर रूग्णांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असते. आपल्या रूग्णाला सहाय्यता मिळावी यासाठी रूग्णाचे नातेवाईक रोज या कक्षाला भेट देत असतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष ज्या ठिकाणी आहे तेथील डेस्कवरील सिलिंगचा काही भाग कोसळला आहे.

आज सकाळी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेरील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोसळलेला भाग गंजलेल्या लोखंडाचा होता आणि सफाई कर्मचाऱ्यांकडून तो ढिगारा वेळीच हटवण्यात आला आहे.

Published on: Jul 25, 2025 02:02 PM