Manoj Jarange Morcha : कुणाचा जल्लोष, कुणी झोपलं तर काही… CSMT स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दीच गर्दी, बघा VIDEO
मराठा आंदोलकांची मोठी गर्दी CSMT स्थानकात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. हा प्रकार समजताच जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेच आवाहन केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी उचलून धरत आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून राज्यभरातील मराठा आंदोलकांना मोठ्या संख्येने मुंबईला येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहानानंतर राज्यभरातील आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत आझाद मैदावर मोठी गर्दी केली. दरम्यान, शेकडोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत धडकल्याने सर्वत्र भगवं वादळ परसल्यासारखं चित्र दिसतंय. यामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. अशातच या आंदोलकांनी आता सीएसएमटी स्थानकावर मोठी गर्दी केली आहे. हे सर्व आंदोलक स्टेशनवरच झोपल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर यांनी मनोज जरांगेंच्या नावाच्या घोषणा देत काहिसा गोंधळही घातल्याचे दिसून आले. बघा व्हिडीओ
