Mumbai | थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्…

Mumbai | थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्…

| Updated on: Apr 27, 2026 | 5:41 PM

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात आज पहाटेच्या सुमारास थरकाप उडवणारा अपघात घडला. गिरगाव चौपाटीजवळ तीन दुचाकींची एकमेकांना भीषण धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यात ३ जणांचा मृत्यू झाला.

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात आज पहाटेच्या सुमारास थरकाप उडवणारा अपघात घडला. गिरगाव चौपाटीजवळ तीन दुचाकींची एकमेकांना भीषण धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यात ३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकासह एक तरुण आणि तरुणी अशा एकूण तीन जणांचा समावेश आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात झालेल्या भीषण अपघातात एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला आहे.

मुंबईची ओळख असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात आज पहाटे ५.४५ च्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळ एक स्पोर्ट्स बाईक आणि दोन स्कूटी यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की या तिन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये एका ६०-६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे.

Published on: Apr 27, 2026 05:41 PM
Follow Us