Shegaons Gajanan Maharaj : शेगावच्या संत गजानन महाराजांच्या मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांचा महासागर

| Updated on: Jan 01, 2026 | 1:31 PM

नवीन वर्षाची सुरुवात संत गजानन महाराजांच्या दर्शनाने करण्यासाठी शेगावच्या विदर्भ पंढरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत धार्मिक वातावरणात करण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मंदिर प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे.

नवीन वर्षाची सुरुवात ही देवदर्शनाने करण्याच्या परंपरेनुसार, विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत धार्मिक वातावरणात करण्यासाठी देशभरातील भक्तांनी शेगाव गाठले आहे. मंदिरात येणाऱ्या लांबूनच्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. व्यवस्थापन समितीने दर्शनासाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून, गर्दीचे नियोजन काळजीपूर्वक केले जात आहे. नवीन वर्षाचा उत्साह धार्मिक स्थळी देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरातील सुट्ट्यांमध्येही शेगावमध्ये भाविकांनी आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. आता 2025 हे वर्ष संपले असून, आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शनाने सुरुवात करण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.

Published on: Jan 01, 2026 01:30 PM