Maval Landslide | मावळमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; पाटण गावात ढिगाऱ्याखाली लोक अडकले, NDRF कडून बचावकार्य सुरू

Maval Landslide | मावळमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; पाटण गावात ढिगाऱ्याखाली लोक अडकले, NDRF कडून बचावकार्य सुरू

| Updated on: Jul 06, 2026 | 2:49 PM

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण गावात मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही नागरिक दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिक आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे जवान संयुक्तपणे युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. दरडीखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्ते बंद होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडत आहेत. पाटण गावातील दरड कोसळण्याच्या घटनेमुळे स्थानिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरातही दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Published on: Jul 06, 2026 2:49 PM
Follow Us