tv9 Marathi Special Report | महापौरपदाचा विषय ‘सूनबाई’ आणि ‘नवरी’पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निकालही लागला मात्र मुंबईचा महापौर नक्की कधी बसणार? यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची अजून गटस्थापना झाली नाही, यामुळे मुंबईकरांना पुढच्या महिन्यातच महापौर मिळणार असं सांगितलं जातंय. मात्र महापौर वरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री यांना चांगलंच डिवचलं आहे.
महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निकालही लागला मात्र मुंबईचा महापौर नक्की कधी बसणार? यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची अजून गटस्थापना झाली नाही, यामुळे मुंबईकरांना पुढच्या महिन्यातच महापौर मिळणार असं सांगितलं जातंय. मात्र महापौर वरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री यांना चांगलंच डिवचलं आहे. यामुळे शाब्दिक चकमक उडाली आहे आणि ती अगदी ‘सुनबाई’ आणि ‘नवरी’ पर्यंत पोहचले. राऊत म्हणतात, ‘शिंदे रुसून बसलेत, रुसलेल्या सुनबाईसारखं दिल्लीला चकरा मारतात’ ‘दिल्लीतले सासरे ऐकत नाही म्हणून सुनबाईंची अडचण झाली आहे’ या टीकेचा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी समाचार घेतला आहे. ‘संजय राऊत हे राहुल गांधींचे नवरी झालेत. जे काँग्रेसचे नवरी झालेत त्यांनी इतरांना सून आणि सासू म्हणू नये’ मुंबईत महापौर पुढच्या महिन्यातच बसेल हे स्पष्ट झालंय.
