Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी ठाकरेंच्या सेनेचा मोठा निर्णय, खबरदारी म्हणून….

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी ठाकरेंच्या सेनेचा मोठा निर्णय, खबरदारी म्हणून….

| Updated on: Sep 18, 2025 | 5:20 PM

दादर येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याभोवती ताडपत्री लावण्यात आली आहे. ठाकरे सेनेकडून पुतळ्याची देखभाल आणि सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून पालिकेकडून परवानगी मागण्यात आली आहे. हे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.

दादर येथे असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे जतन करण्यासाठी ठाकरे सेनेने पुढाकार घेतला आहे. पुतळ्याभोवती ताडपत्री लावण्यात आल्या असून, आता पुढील काळात पुतळ्याचे संपूर्ण सुशोभीकरण केले जाणार आहे. यामध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची स्वच्छता, दुरुस्ती आणि सुरक्षेचे उपाय योजना समाविष्ट आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पुतळ्यावर लक्ष ठेवण्याचाही सेनेचा विचार आहे. या सर्व कामांसाठी पालिकेकडून आवश्यक परवानगी मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेनंतर उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी काल दुपारी दोन वाजता त्याला ताब्यात घेतले. प्रभादेवी येथील त्याच्या घराबाहेर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Published on: Sep 18, 2025 05:20 PM