Imtiaz Jaleel : छोटासा चिंटू ते चिकनी चमेली… जलील नितेश राणे अन् संग्राम जगतापांवर तुटून पडले अन्…

Imtiaz Jaleel : छोटासा चिंटू ते चिकनी चमेली… जलील नितेश राणे अन् संग्राम जगतापांवर तुटून पडले अन्…

| Updated on: Oct 11, 2025 | 11:18 AM

अहिल्यानगर येथील एमआयएमच्या सभेत इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला. जलील यांनी जगताप यांना चिकणी चमेली संबोधत तू क्या चीज है बे! असे आव्हान दिले, तर पठाण यांनी राणेंना स्ट्रेचरवर परत पाठवण्याची धमकी दिली. यावर जगताप यांनी प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत.

अहिल्यानगर येथे एमआयएमने आयोजित केलेल्या सभेत पक्षाचे नेते इम्तियाज जलील आणि वारिस पठाण यांनी भाजप मंत्री नितेश राणे आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यावर कठोर टीका केली. इम्तियाज जलील यांनी संग्राम जगताप यांना चिकनी चमेली असे संबोधत “अरे हम तुम्हारे बाप के बाप को नही छोडे तो तुम चिल्लर क्या चीज है बे!” असे आव्हान दिले. त्यांनी नितेश राणेंना छोटा चिंटू म्हटले. या टीकेला उत्तर देण्यासाठी संग्राम जगताप यांनी आगामी सभांमधून प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले आहेत.

वारिस पठाण यांनी नितेश राणेंना मशिदीत येण्याचे आव्हान देत “येईल दोन पायांवर, जाईल स्ट्रेचरवर” अशी चिथावणी दिली. यावर नितेश राणेंनीही पठाण यांना “भोकणारे कुत्रे काट्टे नाही आणि हे तर नसबंदीवाले पिल्लावळ आहे” असे म्हटले. या सभेत रुहीनाज शेख या एमआयएमच्या कार्यकर्तीने जय भीम जय शिवराय असा नारा देत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

Published on: Oct 11, 2025 11:18 AM