Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले! योजनेसंदर्भात मंत्री आदिती तटकरेंची मोठी माहिती
मंत्री आदिती टटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या निकषांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, योजनेचे निकष सुरुवातीपासूनच स्थिर आहेत आणि कोणताही बदल झालेला नाही. विभागीय डेटाची स्वतंत्रता आणि त्यांच्यातील समन्वयाची प्रक्रिया ही एक नियमित पद्धत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अलीकडेच काही प्रश्न उपस्थित झाले होते. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले अशी चर्चा सुरू असताना यावर मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. याबाबत बोलत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष सुरुवातीपासून आहे तेच आहेत त्यात कोणताही बदल झालेला नाही. पुढे त्या असंही म्हणाल्या की, प्रत्येक विभाग स्वतःचा डेटा स्वतंत्रपणे राखतो आणि महिला व बाल विकास विभाग हा डेटा मिळवण्यासाठी इतर विभागांशी समन्वय साधतो. ही एक नियमित प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे सांगत यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Published on: Sep 18, 2025 05:35 PM
