BMC Election : उत्तर भारतीय महापौर… भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन् ठाकरे बंधूंना डिवचलं

| Updated on: Jan 01, 2026 | 10:52 AM

भाजप नेते कृपाशंकर सिंहांच्या मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनवण्याबाबतच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे बंधूंनी यावर आक्रमक भूमिका घेतली असून, मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचे म्हटले आहे. भाजपने हे सिंहांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत, महापौराचा निर्णय पक्षीय संसदीय मंडळ घेईल असे म्हटले आहे.

भाजप नेते कृपाशंकर सिंहांच्या एका वक्तव्यामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे. मीरा-भाईंदरमध्ये इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, उत्तर भारतीय महापौर होईल, असे सिंह यांनी म्हटले होते. या विधानामुळे उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा सामना सुरू झाल्याचे चित्र आहे. कृपाशंकर सिंहांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंचे नेते आक्रमक झाले आहेत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. कृपाशंकर सिंहांना तुम्ही राजकारणातून बाहेर पडणार आहात का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. या वादामुळे निवडणुकीत मराठी मुद्दा ऐरणीवर आला आहे. भाजपने मात्र कृपाशंकर सिंहांना महापौर कोण होईल, हे ठरवण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. महापौराचा निर्णय राज्याचे संसदीय मंडळ घेईल, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले. कृपाशंकर सिंहांनी नंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत हिंदू महापौर होण्याविषयी बोलले असल्याचे स्पष्ट केले.

Published on: Jan 01, 2026 10:52 AM