Mira Bhayandar March : मनसे, ठाकरे आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? थेट तडकाफडकी बदली अन्…

Mira Bhayandar March : मनसे, ठाकरे आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? थेट तडकाफडकी बदली अन्…

| Updated on: Jul 09, 2025 | 7:31 PM

मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या आंदोलनानंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली आहे. निकेत कौशिक हे आता मीरा-भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त असतील. मुख्यमंत्री फडणवीसांनी महासंचालकांना आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती. या मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली होती? असा सवाल देखील फडणवीसांनी केल्याचं कळतं. त्यानंतर आता मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली.

मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या आंदोलनानंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मधुकर पांडे यांच्या जागी आता निकेत कौशिक नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत. मंगळवारी मनसे, ठाकरे आणि एकीकरण समितीच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नव्हती. परवानगी नसल्याने मोर्चेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मराठी लोकांचा रोष वाढला. दरम्यान, परवानगी नाकारल्याने मराठीसाठी सुरू असलेलं आंदोलन चिघळल्याची परिस्थिती निर्माण झाली.

तर मराठी मोर्चाला परवानगी का नाही? यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिस महासंचालकांकडे विचारणा केली होती. यानंतर पोलीस आयुक्तांवर सरकारकडून कारवाई होण्याचे संकेत कालच मिळाले होते. बुधवारी सरकारने तात्काळ पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली केली. या बदलीमुळे मोर्चाला परवानगी दिली नसल्याचं सरकारला माहीत नव्हतं का? असा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी सरकारला मोर्चाबद्दल चुकीचा रिपोर्ट दिला का? असाही प्रश्न निर्माण झाला.

Published on: Jul 09, 2025 07:28 PM