आमदार लता सोनावणे यांच्या अडचणी वाढणार? आमदारकीही जाणार?

| Updated on: Sep 28, 2022 | 8:47 AM

लता सोनावणे या शिंदे गटाच्या आमदार आहेत. जात प्रमाणपत्रावरुन आदिवासी समाज आता त्यांच्याविरोधात आक्रमक झालाय.

Follow us on

सुमित सरनाईक, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) आमदार लता सोनावणे (Lata Sonawane) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लता सोनावणे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवा, अशी याचिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे करण्यात आलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या याचिकेबाबत आता काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. जात वैधता प्रमाणपत्रावरुन लता सोनावणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आदिवासी संघटनांच्या 522 पदाधिकाऱ्यांनी मिळून राज्यपालांकडे लता सोनावणे यांच्याविरोधात याचिका दिलीय. खोटं जात वैधता प्रमाणपत्राप्रकरणी लता सोनावणे यांच्या अपात्रकेची कारवाई केली जावी, अशी आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. 2019 ची निवडणूक लढवताना टोकरी कोळी हे अनुसूचित जातीचं जातप्रमाणपत्र सादर केलं होतं. मात्र हे प्रमाणपत्र नंदुरबार जात पडताळणी समितीने अवैध ठरवलं होतं. 9 फेब्रुवारी 2022 ला हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात आलीय.