मनोज जरांगे यांच्यासाथीला आमदार संदीप क्षीरसागर, शरद पवारांना ही विनंती करणार
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केले असून त्यांच्या या आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही पाठींबा दिला असून तेही आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला यायला निघाले आहेत.
मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह अंतरावाली सराटीयेथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या सोबत आता जालना येथून शरद पवार गटाचे नेते आमदर संदीप क्षीरसागर हे आपल्या कार्यकर्त्यांसह निघाले आहेत. त्यांनी आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत गेल्यावेळे पेक्षा जास्त लोक असतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणावर शरद पवार काही भूमिका घेत नाहीत याविषयी त्यांना पत्रकारांनी विचारले असता आपण स्वत: शरद पवार यांना तशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रत्येक गावातून दोन वाहने भरुन कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Aug 27, 2025 12:29 PM
