Breaking | दारू आणि मटण खाणारे सेनेवर टीका करतात, माजी जिल्हाप्रमुखांचा शहाजीबापू पाटलांवर हल्लाबोल
शहाजी पाटलांमुळेच भावाने आत्महत्या केली असेही अभंगराव यांनी म्हटले आहे. तर शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये आपल्याकडून घेतले होते, मात्र ते अद्यापही परत केले नाहीत, असा आरोपही अभंगराव यांनी केला आहे.
‘काय झाडी, काय डोंगार’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांच्याच मतदार संघात टीका करण्यात आली आहे. माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी टीका करताना, दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु आणि 4 किलो मटण खाणारा गद्दार शिवसेना वर टीका करतोय, असं अभंगराव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शहाजी पाटलांमुळेच भावाने आत्महत्या केली असेही अभंगराव यांनी म्हटले आहे. तर शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये आपल्याकडून घेतले होते, मात्र ते अद्यापही परत केले नाहीत, असा आरोपही अभंगराव यांनी केला आहे. त्याचबरोबर शहाजीबापूंनी मतदारसंघासाठी निधी आणला त्यातनच बंगला बांधण्यास सुरुवात केली, अशीही टीका अभंगराव यांनी केली आहे.
Published on: Aug 21, 2022 06:08 PM
