‘मनसे 3 मेच्या अल्टीमेटमवर ठाम’; बाळा नांदगावकरांची माहिती

| Updated on: Apr 25, 2022 | 4:59 PM

राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि मशिदींवरील भोंग्यांवरुन राज्यातील वातावरण तापल्यानंतर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.

Follow us on

मुंबई: राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि मशिदींवरील भोंग्यांवरुन राज्यातील वातावरण तापल्यानंतर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे मात्र भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी राज्यातील अजानचा भोंगा बंद होणार नसल्याची भूमिका सर्वपक्षीय बैठकीत घेतली गेल्याची माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिलीय. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला 3 मे चा अल्टिमेटम कायम असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जाहीर केलंय.