MNS : गुणरत्न सदावर्ते भाजपनं पाळलेला, त्याला चौकात उभं करून… मनसे नेत्याचा हल्लाबोल

MNS : गुणरत्न सदावर्ते भाजपनं पाळलेला, त्याला चौकात उभं करून… मनसे नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Jun 27, 2025 | 4:53 PM

‘कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंची मुजोरी पाहायला मिळाली. कोण येतं बघू म्हणजे तुझ्या बापाचा महाराष्ट्र आहे का? महाराष्ट्राचा सात बारा तुझ्यानावावर झालाय’, असं म्हणत सदावर्तेंनी एकेरी उल्लेख करत टीका केली. यानंतर मनसेने पलटवार केलाय.

गुणरत्न सदावर्ते हा भाजपाने पाळलेला माणूस आहे. अशा माणसाला चौकात उभं करून मारले पाहिजे. असाच सदावर्ते बोलत राहिला तर मराठी माणूस याला मारेल, असं म्हणत अविनाश जाधव यांनी सदावर्तेंच्या टीकेनंतर संताप व्यक्त केला. तर मुंबईत होणाऱ्या मोर्च्याबद्दल बोलताना अविनाश जाधव म्हणाले, मराठी माणसासाठी राज ठाकरे पहिले पाऊल उचलतात. हिंदी सक्तीविरोधातील ५ जुलैच्या मोर्चात ठाण्यातील कलाकार, विद्यार्थी पालक संघटना आमच्या सोबत आहेत. यासह अनेक संस्था, संघटना एकत्र येणार आहे, असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. पुढे अविनाश जाधव असेही म्हणाले की, इयत्ता १ ते ४ थी मातृभाषा शिकवली पाहिजे असे जाणकार सांगतात पण तुम्ही का सक्ती करता? हे दिल्लीश्वरला खुश करण्यासाठी चालू आहे, असं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय.

Published on: Jun 27, 2025 04:53 PM