पैसे देऊन बलात्कार सुरू, राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावरून आक्रमक, बघा स्पेशल रिपोर्ट

पैसे देऊन बलात्कार सुरू, राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावरून आक्रमक, बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jan 16, 2024 | 12:18 PM

बारसूनंतर रायगडच्या जमिनीवर परप्रांतियांचा डोळा असून मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं काम सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलंय. थोडक्यात परप्रांतियांकडून मराठी माणसांच्या जमिनी कशा बळकावल्या जाताय यासंदर्भात स्पष्टच भाष्य पत्रकार परिषद घेत केले आहे.

मुंबई, १६ जानेवारी २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा परप्रातियांकडे वळवलाय. रायगडच्या जमिनीवर राज ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेतली. तर बारसूनंतर रायगडच्या जमिनीवर परप्रांतियांचा डोळा असून मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं काम सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलंय. थोडक्यात परप्रांतियांकडून मराठी माणसांच्या जमिनी कशा बळकावल्या जाताय यासंदर्भात स्पष्टच भाष्य पत्रकार परिषद घेत केले आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये मोठाले सरकारी प्रोजेक्ट पाहून स्थानिकांकडून परप्रांतिय जमिनी खरेदी करत आहेत. कवडीमोल पैसे देत मराठी माणसाला देशोधडीला लावलं जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलंय. अलिबागमध्ये जमिन परिषद घेऊन राज ठाकरे यांनी जमिनीचे व्यवहार काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला. तर दलालांपासून सावध राहण्याचं आवाहनही मराठी माणसांना राज ठाकरेंनी केले. बघा काय दिला राज ठाकरे यांनी इशारा?

Published on: Jan 16, 2024 12:18 PM