MNS : …तरी ते गटारातच उडी मारणार, मनसेच्या महाजनांची नारायण राणेंवर खोचक टीका
प्रकाश महाजन यांनी राणे यांना खुले आव्हान दिले त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. बघा काय केली जिव्हारी लागणारी टीका
मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यातील शाब्दिक युद्ध सध्या चांगलंच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. राणे यांनी प्रकाश महाजन यांची लायकी काढत जास्त बोललात तर उलट्या करायला लावेन, अशा शब्दांत टीका केली होती. त्यानंतर महाजन यांनीही दंड थोपटत राणे यांना ओपन चॅलेंज दिले होते. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना डिवचलं असून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठीत लिहिलेले इंग्रजीत वाचता आले नाही…म्हणून त्यांचं मंत्रीपद गेले, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी राणेंवर बोचरी टीका केली. तर नारायण राणे यांनी संघाविषयी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काय उद्गार काढलेले आहेत ते बघा.. बेडकाला सोन्याच्या बाळण्यात बसवलं तरी ते गटारीतच उडी मारणार, अशा खोचक शब्दांत महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.
