Special Report | चौफेर टीकेनंतर अखेर आमदार महोदयांची माफी

Special Report | चौफेर टीकेनंतर अखेर आमदार महोदयांची माफी

| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 11:35 PM

आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. मात्र, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

वसमत शहरात शिवाजी महाराज यांचा पंचधातूने बनवण्यात आलेला 14 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी जयपूरवरुन हा पुतळा वसमतच्या दिशेनं रवाना झाला होता. बुधवारी (13 ऑक्टोबर) दुपारी औंढा नागनाथ शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. त्यानंतर शिवरायांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाला. त्यावेळी आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. मात्र, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय.