मनसेकडून नारळी पौर्णिमा साजरी, पोलिसांच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांचा उत्साह
मनसेच्या शाखा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र, मनसेकडून नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून मुंबईतल्या दादर भागात नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येत आहे. हिंदू सणांसाठी मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या नारळी पौर्णिमा कार्यक्रमापुर्वी, मुंबई पोलिसांकडून मनसैनिकांना 149 ची नोटीस देण्यात आली होती. मनसेच्या शाखा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र, मनसेकडून नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच पेक्षा जास्त लोक जमा झाल्यास कारवाई होईल, असा इशारा दिली होता. अटक झाली, काहीही झालंतरी सण साजरा करणार ही भूमिका मनसेनं घेतली होती. दादरमध्ये मनसे आणि पोलीस आमने- सामने आले होते.
