Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत 15 ऑगस्ट रोजी नागपुरात तरुणांशी संवाद साधणार आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ‘भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांचे योगदान’ या विषयावर मोहन भागवत तरुणांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.

नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या भविष्यात तरुणांची भूमिका, राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि भारताला अधिक सक्षम बनवण्यासाठी तरुणांनी कोणत्या दिशेने काम करावे, यासंदर्भात या संवादातून विचार मांडले जाणार आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होणाऱ्या या कार्यक्रमामुळे नागपुरातील तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मोहन भागवत यांच्या या संवादाकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.
Published on: Aug 11, 2026 11:26 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us