Raut साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू आईड बॉय आहात की शरद पवारांचे?’ : Mohit Kamboj

Raut साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू आईड बॉय आहात की शरद पवारांचे?’ : Mohit Kamboj

| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 10:32 PM

4 सप्टेंबर 2017 ला राऊत माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी येतात. मी सांगू इच्छित नाही पण जीवनात अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे पैशाबाबत मदत मागितली आणि मी त्यांची मदतही केली, असा दावा कंबोज यांनी केलाय.

संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना मोहित कंबोज म्हणाले की, ‘राऊतांनी सुरुवात केली की मोहित कंबोजला मी ओळखत नाही. 4 सप्टेंबर 2017 ला राऊत माझ्या घरी आले होते. ते प्रत्येक वर्षी माझ्या घरी येतात. मी सांगू इच्छित नाही पण जीवनात अनेक वेळा त्यांनी माझ्याकडे पैशाबाबत मदत मागितली आणि मी त्यांची मदतही केली, असा दावा कंबोज यांनी केलाय. तसंच ‘माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की मला त्यांनी फडणवीसांसारख्या मोठ्या माणसाचा एक छोटा बॉय म्हटलं. माझा राऊतांना सवाल आहे की ते उद्धव ठाकरे यांचे ब्ल्यॅू आईड बॉय आहेत की शरद पवार यांचे? संजय राऊत यांनी आपली लॉयल्टी कुणाशी आहे ते आधी स्पष्ट करावं’, असा खोचक टोला कंबोज यांनी राऊतांना लगावलाय.