Special Report | लढणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

| Updated on: Aug 28, 2021 | 11:50 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू निवासस्थानाबाहेर राडा करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून बक्षीस मिळालंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. त्यावेळी भाजप आणि युवासेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आहे. तेव्हा युवासेनेचा पदाधिकारी असलेल्या मोहसीन शेखला पोलिसांच्या लाठ्यांचा चांगलाच प्रसाद मिळाला होता. त्यानंतर आता युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मोहसीनला मोठं बक्षीस दिलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख (Mohsin Shaikh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बढतीनंतर ‘मी पद मिळवण्यासाठी आंदोलन केलं नाही तर आमचं दैवत असलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत राणेंच्या केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी केल्याचं’ मोहसीनने म्हटलंय.

मला पद मिळवण्यासाठी मी हे केलेलं नाही. आमचे दैवत असलेले पक्षप्रमुख आणि लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मी आंदोलनात सहभागी झालो होतो. पण समोरुन पेव्हरब्लॉक, दगडफेक करण्यात येत होती. त्याला विरोध करताना पोलिसांकडून मारहाण झाली असलं मोहसीनचं म्हणणं आहे. मी कट्टर शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आम्हाला चॅलेंज केलं तर त्याला आम्ही विरोध करणारच. मी मुस्लीम असलो तर कट्टक शिवसैनिक आहे. माझ्यासाठी पक्षप्रमुख आणि संघटना महत्वाची आहे. युवासेनेचं पद मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे. पक्षासाठी अखेरपर्यंत काम करत राहणार, असं मोहसीन शेखने म्हटलंय.