Money Laundering Probe : बड्या माजी क्रिकेटर्सना दणका… थेट प्रॉपर्टी जप्त, नेमकं प्रकरण काय?
ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्यावर कारवाई केली आहे. यात दोघांची एकूण 11.14 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. शिखर धवन यांची 4.5 कोटींची मालमत्ता, तर सुरेश रैना यांचे 6.64 कोटींचे म्युच्युअल फंड जप्त करण्यात आले असून, ही कारवाई PMLA कायद्याखाली करण्यात आली आहे.
मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जप्तीची कारवाई केली आहे. एकूण 11 कोटी 14 लाख रुपयांच्या मालमत्ता या प्रकरणात जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईमध्ये, भारतीय संघाचा स्टार फलंदाज शिखर धवन यांची 4 कोटी 50 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर, माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यांचे 6 कोटी 64 लाख रुपयांचे म्युच्युअल फंड जप्त करण्यात आले आहेत. मनी लाँडरिंगच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून, दोन्ही क्रिकेटपटूंवर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (PMLA) म्हणजेच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, ईडीने कायद्यानुसार आवश्यक ती पाऊले उचलली आहेत. या कारवाईमुळे क्रीडा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीने केलेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे मनी लाँडरिंग प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांकडून या संदर्भात पुढील कार्यवाही अपेक्षित आहे.
