मुंबई मोनोरेलची विघ्न संपेना! वाडाळ्यात मोनोचा डब्बा घसरला अन्…
मुंबईच्या वडाळा येथे चाचणीदरम्यान मोनोरेलचा डब्बा घसरला. या अपघातात मोटरमन जखमी झाला असून, रुळाचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने प्रवाशी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
मुंबईच्या वडाळा येथे चाचणीदरम्यान मोनोरेलचा डब्बा घसरला. या अपघातात मोटरमन जखमी झाला असून, रुळाचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने प्रवाशी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तांत्रिक बिघाडांमुळे मोनोरेल सेवा वारंवार बाधित होत असून, आता पुन्हा सेवेला विलंब लागण्याची शक्यता आहे. एमएमआरडीए अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.
या अपघातात मोटरमन जखमी झाला आणि त्याला घटनास्थळावरून वाचवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने डब्ब्यात कोणी प्रवासी नव्हता म्हणून इतर कोणी जखमी झाला नाही. तर घटनास्थळी मोनोरेलचा डब्बा काढण्याचा काम सुरू आहे. या घटनेत ट्रेनचे अलाइनमेंट खराब झाले आहे. एमएमआरडीए आणि पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मोनोरेल सेवा सध्या बंद असून नवीन आलेल्या डब्याची चाचणी दरम्यान हा अपघात आज सकाळी झालाय जेणेकरुन मुंबईकराना मोनोरेल सेवेसाठी आणखीन किती दिवस वाट पहावी लागणार हे सांगता येत नाही .