Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा
Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये दाखल झालेला मान्सून लवकरच विदर्भातही प्रवेश करणार आहे. 12 ते 14 जूनदरम्यान मान्सूनचे (Monsoon) विदर्भात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या काळात मान्सून गडचिरोली, गोंदिया हा सारा परिसर व्यापेल, असा अंदाज नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी वर्तविला आहे.
