धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्… पुढे काय घडलं?

धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस ठेवला अन्… पुढे काय घडलं?

| Updated on: Jun 08, 2026 | 2:24 PM

जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या 5 दिवसांवर आला असताना तिच्याच आईने प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्याची माहिती उघड झाली.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या 5 दिवसांवर आला असताना तिच्याच आईने प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्याची माहिती उघड झाली. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरातही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या प्रियकराने लग्नानंतरचे फोटो मोबाईल स्टेटसवर ठेवले होते. हे फोटो पाहिल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकाराची माहिती मिळाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पती आणि कुटुंबीय हादरून गेले.

दरम्यान, मुलीचा साखरपुडा जवळ आल्यामुळे समाजात बदनामी होत असल्याची व्यथा पतीने व्यक्त केली. त्यानंतर तो थेट जामनेर पोलिस ठाण्यात पोहोचला आणि संबंधितांना मोबाईलवरील स्टेटस काढण्याची विनंती केली.

पोलिसांनी तातडीने प्रियकराला बोलावून समज दिल्यानंतर हे प्रकरण शांत झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Jun 08, 2026 2:24 PM
Follow Us