MSRTC Accident : महाड-दापोली राज्य मार्गावर लालपरीचा भीषण अपघात, नेमकं कारण काय?

MSRTC Accident : महाड-दापोली राज्य मार्गावर लालपरीचा भीषण अपघात, नेमकं कारण काय?

| Updated on: Jul 23, 2025 | 7:15 PM

महाड दापोली राज्य मार्गावर पुणे फौजी आंबवडे एसटी बसचा भीषण अपघात जालाय. बस रस्त्याच्या कडेला घसरून थेट झाडाला आदळली. अपघातात आठ प्रवासी गंभीर जखमी तर 2 किरकोळ जखमी झालेत.

रायगडच्या महाड दापोली राज्य मार्गावर एक एसटी बसचा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. पुणे फौजी आंबवडे या एसटी बसचा अपघात झाला आहे. ही एसटी बस आंबवडे दिशेला जात असताना अपघाताची घटना घडली. रस्त्याच्या कडेला घसरून थेट झालावर आदळली. या अपघातात एकूण आठ प्रवासी जखमी झाले आहे. तर दोन किरकोळ जखमी झालेत. जखमींना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एसटी बसचे देखील समोरील बाजूचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आलेल्या फोटोतून पाहायला मिळत आहे.

बसमधील जखमी प्रवाशांची नावे अशी..

१) अविनाश पांडुरंग लोखंडे (३४ वर्ष – पिंपरी चिंचवड चालक)

२) पौर्णिमा  प्रमोद होन कडसे (४६ वर्ष पुणे वाहक)

३) आशाबाई नारायण जाधव ( ७५ वर्ष फौजी आंबवडे)

४) शारदा गजानन शेलार (६७ वर्ष फौजी अंबवडे)

५) सोहम ज्ञानेश्वर पवार (१७ वर्ष फौजी अंबवडे)

६) सिमाब सिकंदर पेडेकर (१६ वर्ष शिरवली)

७) सलवा अब्दुल सलाम पेडेकर (१७ वर्ष शिरवली)

८) आराधना दिगंबर पवार (१७ वर्ष फौजी अंबवडे)

९) लहू सखाराम पाते  (५५ वर्ष पांगरी)

१०) विश्वजीत सोपान कदम  (२७ वर्ष शिरवली)

Published on: Jul 23, 2025 07:15 PM