पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू

| Updated on: Jan 14, 2026 | 1:49 PM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी व्यापक तयारी सुरू झाली आहे. सायन येथील एफ नॉर्थ निवडणूक केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप केले जात आहे. एक कोटींहून अधिक मतदारांसाठी निष्पक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग, मुंबई पोलीस आणि बेस्टची वाहतूक व्यवस्था सज्ज आहे. जवळपास 20 ते 30 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरपालिकेत उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत. सायन येथील एफ नॉर्थ निवडणूक केंद्रावर कर्मचाऱ्यांकडून मतदान साहित्याचे वाटप सुरू आहे. यामध्ये बॅलेट युनिटचाही समावेश आहे.

एफ नॉर्थ केंद्रांतर्गत येणाऱ्या आठ ते नऊ वॉर्डांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी सज्ज झाले आहेत. मुंबईत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. जवळपास 20 ते 30 हजार पोलीस कर्मचारी शहराच्या रस्त्यांवर आणि मतदान केंद्रांवर तैनात केले जाणार आहेत. मुंबईतील एक कोटींहून अधिक मतदारांसाठी निष्पक्ष आणि शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Published on: Jan 14, 2026 01:48 PM