Mumbai CNG Shortage: ऑटोवाल्यांची मनमानी… CNG चा तुटवडा अन् प्रवाशांची लुटमार, बघा नागरिकांचा संताप

Mumbai CNG Shortage: ऑटोवाल्यांची मनमानी… CNG चा तुटवडा अन् प्रवाशांची लुटमार, बघा नागरिकांचा संताप

| Updated on: Nov 18, 2025 | 4:47 PM

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे प्रवाशांना सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक रिक्षाचालक प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारत असून, इच्छित स्थळी जाण्यासाठी नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे १३३ पंपांवर सीएनजीचा परिणाम झाला आहे.

मुंबईत सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील बहुतांश पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षा आणि टॅक्सींची संख्या रस्त्यावर कमी झाली आहे. याचा फायदा घेत काही रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

चेंबूरमधील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपाऊंडमधील गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे. सुमारे १३३ सीएनजी पंपांवर याचा परिणाम झाल्याने वाहनचालकांना इंधन भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. प्रवाशांना कामावर जाण्यासाठी उशीर होत असून, काही ठिकाणी दुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. बस आणि ओला-उबर सेवांवरही याचा परिणाम दिसून येत आहे.

Published on: Nov 18, 2025 04:47 PM