साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा
साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयात पार पडलेल्या या सुनावणीदरम्यान, मुंबई पोलिसांनी (Sakinaka crime) नराधम आरोपीला जगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा युक्तिवाद केलाय. या आरोपीनं 32 वर्षांच्या एका महिलेवर बलात्कार केला होता. त्यानंतर या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हत्यार टाकून तिचा खून केला होता. पीडितेच्या वतीनं आणि सरकारी पक्षातून मुंबई सत्र न्यायलयामध्ये बुधवारी युक्तिवाद पूर्ण करण्यात आला.
