Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांना आझाद मैदानावर नो एन्ट्री, मुंबई हायकोर्टानं मनाई करत नेमकं काय म्हटलं?
मुंबईत गणेशोत्सव जवळ काळामध्ये मुंबईमध्ये आंदोलन करण्यास जरांगेंना मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय. मुंबईमधल्या आझाद मैदानावर जरांगेंना आंदोलन करता येणार नाही, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे.
गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगेंना हायकोर्टाने स्पष्ट नकार दिलाय. मुंबईतल्या आझाद मैदानावर जरांगेंना आंदोलन करता येणार नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय. गणेशोत्सवात मुंबईत रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत आंदोलनास मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय. नवीन मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं हायकोर्टाचं मत आहे. सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या, असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय निदर्शन करता येणार नाहीत हायकोर्टकडून स्पष्ट करण्यात आलंय. मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला असला तरी मनोज जरांगे मात्र मुंबईत जाऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. हायकोर्टाच्या नकारानंतर सुद्धा जरांगे मुंबईत येण्यावर ठाम आहेत. तर मुंबईत परवानगी नाकारण्यामागे फडणवीसांचा खेळ असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय.
