Badlapur Rain : बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान

Badlapur Rain : बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान

| Updated on: May 26, 2025 | 1:44 PM

Badlapur market waterlogging : मुसळधार पावसासह राज्यात मान्सूनने हजेरी लावलेली आहे. यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी शिरलं आहे.

बदलापूर रेल्वेस्टेशन परिसरात असलेल्या मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचं नुकसान झालं आहे.

मुंबईत मान्सून दाखल झालेला आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात धो-धो पावसाच्या सरी बरसत आहेत. या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. हे पाणी आता नागरिकांच्या घरांसह बाजारपेठेतल्या दुकानांमध्ये देखील शिरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली बघायला मिळत आहे. बदलापूरच्या रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या बाजारपेठेत या मुसळधार पावसाने पाणी भरलं आहे. हे पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये गेल्याने व्यापाऱ्यांचा माल भिजला असून नुकसान झालं आहे. तर बदलापूरच्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे.

Published on: May 26, 2025 01:42 PM