अडीच तासापासून अडकलेली मोनो रेल अखेर सुरू

अडीच तासापासून अडकलेली मोनो रेल अखेर सुरू

| Updated on: Sep 15, 2025 | 11:17 AM

मुंबईतील वडाला परिसरात आज सकाळी साडेसहा वाजता मोनोंरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकली. अडीच तासांनंतर ती पुन्हा सुरू झाली. यावेळी 17 प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या मोनोंरेलमध्ये हलविण्यात आले. अग्निशमन दलाचे पाचरण करण्यात आले होते, परंतु ते आवश्यक नव्हते. मोनोंरेलची सेवा आता पूर्ववत झाली आहे.

मुंबईतील वडाला परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास चेंबुरकडे जाणारी मोनोंरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकली. मोनोंरेलमध्ये मोटरमनसह एकूण १९ जण होते. अग्निशमन दलाने पाचरण केले, परंतु लॅडरच्या मदतीने सर्व १७ प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या मोनो रेलमध्ये हलविण्यात आले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर, तांत्रिक टीमने मोनोंरेल दुरुस्त केली आणि ती ट्रॅकवरून हलवण्यात आली. मोनोंरेलची सेवा आता पूर्ववत झाली असून, वेळापत्रकावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

Published on: Sep 15, 2025 11:17 AM