कबुतरांना खाद्यपदार्थ देण्याचे प्रकार सुरूच; मनपाकडून कारवाईचा बडगा

कबुतरांना खाद्यपदार्थ देण्याचे प्रकार सुरूच; मनपाकडून कारवाईचा बडगा

| Updated on: Aug 10, 2025 | 12:00 PM

कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्यपदार्थ देण्याचे प्रकार सुरूच आहेत. मनपा कडून याबाबत कारवाई केली जात असून डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्यपदार्थ देण्याचे प्रकार सुरूच आहेत. मनपा कडून याबाबत कारवाई केली जात असून डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. गिरगाव चौपाटीवर देखील मध्यरात्री कबुतरांना खाद्यपदार्थ देण्याचा प्रकार सुरू होता. आत्तापर्यंत मनपाकडून 8 हजारांचा दंग वसूल करण्यात आलेला आहे.

मुंबईत कबूतरखाना आणि कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेनं अनेक ठिकाणी कबूतरखाने बंद केले आहेत. दादरच्या कबूतरखान्याला मुंबई महापालिकेने ताडपत्रीने झाकले होते, त्यानंतर जैन समाजाने आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलक कबूतर खान्यामध्ये घुसून त्यांनी ताडपत्री सोडवून कबूतरखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. यावर न्यायालयाने ताशेरेही ओढले. मात्र अद्यापही कबुतरांना खाद्य पदार्थ देण्याचा प्रकार सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे.

Published on: Aug 10, 2025 12:00 PM