Special Report | पोलिसांचा लाव रे तो व्हिडीओ...आरोपांचा पर्दाफाश

Special Report | पोलिसांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’…आरोपांचा पर्दाफाश

| Updated on: Apr 26, 2022 | 9:05 PM

मुंबई पोलीसांनी राणा दाम्पत्याला नेमकी कशी वागणूक दिली याचा पुरावाच मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केलाय. त्यात ते म्हणतात, आणखी काही बोलण्याची गरज आहे का? या प्रकरणात राणा दाम्पत्य चांगलंच अडचणीत येताना दिसतंय.

मुंबई: खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी पाणीही दिलं नाही तसेच वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही, असा आरोप मुंबई पोलिसांवर करण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांनीही सत्ताधारी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. मात्र या सर्व वादावर मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी पडदा टाकत नवनीत राणा आणि रवी राणा यांचा खोटारडेपणा उघड केला आहे. राणा दाम्पत्याचा एक व्हिडीओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केलाय. त्यात ते बिस्लरीचं पाणी पितायत एवढंच नाही तर पोलीसांनी दिलेली कॉफीही पिताना दिसतायत. मुंबई पोलीसांनी राणा दाम्पत्याला नेमकी कशी वागणूक दिली याचा पुरावाच मुंबई पोलीस आयुक्तांनी ट्विट केलाय. त्यात ते म्हणतात, आणखी काही बोलण्याची गरज आहे का? या प्रकरणात राणा दाम्पत्य चांगलंच अडचणीत येताना दिसतंय.