Mumbai Mega Block : उद्या रेल्वेने प्रवास करताय? लोकल 6 तास बंद, कुठे कसा असणार मेगाब्लॉक?

Mumbai Mega Block : उद्या रेल्वेने प्रवास करताय? लोकल 6 तास बंद, कुठे कसा असणार मेगाब्लॉक?

| Updated on: May 24, 2025 | 12:40 PM

मध्य रेल्वे वरील ठाणेहून ११.०७ ते ३.५१ या वेळेत निघणाऱ्या लोकल अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्या स्थानकांवर थांबत माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवतील. प्रवाशांनी प्रवास नियोजन करताना या वेळा लक्षात घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेवर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर पंधरा मिनिटे लोकल सेवा उशिराने सुरू राहतील तर ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा सहा तास बंद राहणार आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात उद्या २५ मे रोजी (रविवार) मेगाब्लॉक जाहीर केला आहे. विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे वरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटीहून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ दरम्यान निघणाऱ्या लोकल गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. मात्र या जलद मार्गावर जात असले तरी या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबतील. तर दुसरीकडे ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान ११.१० ते ४.१० दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. या वेळेत ठाणे-वाशी/पनवेल आणि पनवेल-वाशी-ठाणे दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

Published on: May 24, 2025 12:40 PM