Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी

Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी

| Updated on: Sep 13, 2026 | 12:59 PM

मुंबईत दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मलबार हिल आणि दादरसह शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, गणेशोत्सवाच्या तोंडावर खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या गणेश भक्तांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई शहरात दीड महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्रीपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून, आज सकाळी ६ वाजल्यापासून शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः मलबार हिल, दादरसह अनेक परिसरात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.

या पावसामुळे ऐन पावसाळ्यात जाणवणाऱ्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तोंडावर या पावसामुळे गणेश भक्तांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. गणेश मूर्ती खरेदी, सजावटीचे साहित्य आणि इतर तयारीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पावसाचा अडथळा निर्माण होत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्याही अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात मुंबईकरांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

 

Published on: Sep 13, 2026 12:59 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us