पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. यासोबतच वादळी वाऱ्यांचा वेग वाढला आणि समुद्रालाही मोठे उधाण आले.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारी 4.26 मीटर उंच लाटा उसळल्या. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर जुहू चौपाटी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये समुद्र खवळलेला दिसला. जोरदार वाऱ्यासह मोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळताना पाहायला मिळाल्या. अनेक नागरिकांनी ही दृश्ये मोबाईलमध्ये कैद केली. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. मुंबईतील अनेक भागांमध्ये दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवनावरही त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.