Govandi Accident : गोवंडीत डंपरनं चिरडून तिघांचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून ठिय्या
मुंबईतील गोवंडी भागात झालेल्या अपघातानंतर संतप्त जमावाने रस्ता अडवून धरला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईत एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील गोवंडी भागात हा भीषण अपघात झाला आहे. गोवंडीतील शिवाजीनगर या भागात ही घटना घडली. या अपघाता एका डंपरच्या चालकानं तीन जणांना अक्षरशः चिरडून टाकल्याची माहिती मिळतेय. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकारामुळे एकच वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या अपघातानंतर संतप्त जमावाकडून ठिय्या करण्यात आलाय. अपघातानंतर बघ्यांची आणि लोकांची गर्दी वाढतच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील कऱण्यात आला आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
Published on: Jun 14, 2025 06:07 PM
