Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?

Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?

| Updated on: Nov 23, 2026 | 10:10 AM

मुंबई आणि ठाण्यात रॅपिडो विरोधात रिक्षा संघटनांनी संपाची हाक दिली होती, मात्र या संपावरून रिक्षाचालकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. अनेक रिक्षा आजही रस्त्यावर धावताना दिसत आहेत, विशेषतः मुंबईच्या उपनगरांत आणि ठाण्यात रिक्षासेवा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे संपाचा अपेक्षित परिणाम जाणवत नाहीये.

मुंबई आणि ठाण्यात रिक्षाचालकांनी रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेविरोधात संपाची हाक दिली होती, मात्र या संपाबाबत रिक्षाचालकांमध्येच मोठा संभ्रम पाहायला मिळत आहे. रिक्षा संघटनांनी राज्यव्यापी संपाची घोषणा केली असली तरी, अनेक रिक्षा आजही मुंबई आणि ठाण्यातील रस्त्यांवर नेहमीप्रमाणे धावताना दिसत आहेत.

वांद्रे, बोरीवली, गोरेगाव, कांदिवली, मालाड यांसारख्या मुंबई उपनगरांमधील स्थानकांवर ऑटो रिक्षा सेवा सुरळीत सुरू आहे. ठाणे परिसरातही संपाचा कोणताही परिणाम दिसून येत नाहीये आणि प्रवाशांना सहज रिक्षा उपलब्ध होत आहेत. मनसे वाहतूक सेना आणि धडक कामगार युनियनसह काही संघटनांनी या संपाला पाठिंबा दर्शवला होता, तरीही त्याचा व्यापक परिणाम झालेला नाही. ठाण्यात बेकायदेशीर रॅपिडो आणि सीएनजी दरवाढीच्या विरोधात १ तारखेला संप पुकारण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. एकूणच, रिक्षाचालकांच्या संपाची हाक असूनही, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसत आहे.

Published on: Nov 23, 2026 10:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us