मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप

| Updated on: Dec 26, 2024 | 2:50 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत अचानक वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात होता. या संदर्भात निवडूक आयोगाने स्पष्टीकरण केलेले आहे. या संदर्भात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज धक्कादायक आरोप केला आहे. निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊत यांचा तोल देखील ढळला आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा मतदानाच्या दिवशी वाढलेल्या मतदानासंदर्भात स्पष्टीकरण केले आहे. यात कोणताही गडबड घोटाळा झाला नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले की बीड-परळीत किमान 118 पोलिंग बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेले नाही. तुम्हाला माहिती आहे का? याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. परळी विधानसभेच्या 118 बुथवर मतदान होऊ दिलेले नाहीए…मतदारांना दहशतीने बंदूक दाखवून पळवून लावलेले आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना दिसले नाही. निवडणूक आयोगाला दिसले नाही. असला #&$@ निवडणूक आयोग हा..आम्हाला अक्कल शिकवतोय का ? आमच्यावर नियम लादतोय..एकशे अठरा ठिकाणी…यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस लक्षात घ्या….

Published on: Dec 26, 2024 02:49 PM